अटी आणि शर्ती

शेवटचा अद्यतन दिनांक: नोव्हेंबर 2025
वेबसाइट: www.nashikelection.in

1. परिचय

या वेबसाइटचा (nashikelection.in) वापर करून आपण खालील अटी व शर्ती मान्य करत आहात. कृपया या अटी काळजीपूर्वक वाचा. जर आपण या अटींशी सहमत नसाल, तर कृपया ही वेबसाइट वापरू नका.

2. सेवेचा उद्देश

या पोर्टलचा उद्देश नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाग घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांना डिजिटल माध्यमातून प्रचाराची व प्रसिद्धीची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
ही वेबसाइट कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा निवडणूक आयोगाशी थेट संबंधित नाही.

3. नोंदणी आणि माहिती

उमेदवाराने दिलेली सर्व माहिती (नाव, प्रभाग, संपर्क क्रमांक, फोटो, पक्ष इ.) खरी व अचूक असणे आवश्यक आहे.

चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास वेबसाइट प्रशासन उमेदवाराची प्रोफाइल हटवू शकते.

सर्व माहिती पोर्टलवर सार्वजनिक स्वरूपात प्रदर्शित केली जाईल.

4. पेमेंट आणि शुल्क

सर्व सेवा व पॅकेजेससाठी आगाऊ पेमेंट आवश्यक आहे.

पेमेंट एकदा झाल्यानंतर ती रक्कम परत केली जाणार नाही.

दर व सेवा वेळोवेळी बदलू शकतात, आणि त्याचा निर्णय वेबसाइट प्रशासन घेईल.

5. प्रचार साहित्य आणि जबाबदारी

उमेदवाराने दिलेलं प्रचार साहित्य (फोटो, व्हिडिओ, घोषवाक्य, वचनपत्र इ.) हे निवडणूक आचारसंहितेप्रमाणे असणे आवश्यक आहे.

या सामग्रीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर वादासाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहील.

वेबसाइट प्रशासन कोणत्याही राजकीय विधान, मत किंवा प्रचाराची जबाबदारी घेत नाही.

6. गोपनीयता आणि डेटा वापर

उमेदवारांकडून गोळा करण्यात आलेली माहिती केवळ प्रचार सेवेसाठी वापरली जाईल.

कोणतीही वैयक्तिक माहिती तृतीय पक्षाला विकली किंवा शेअर केली जाणार नाही.

अधिक माहितीसाठी कृपया आमच्या “Privacy Policy” पृष्ठाचा संदर्भ घ्या.

7. वेबसाइट वापर मर्यादा

या वेबसाइटचा वापर कोणत्याही गैरकायदेशीर किंवा दिशाभूल करणाऱ्या हेतूसाठी करू नये.

वेबसाइटवरील माहिती, फोटो, डिझाईन किंवा डेटा विनापरवानगी कॉपी किंवा पुनर्प्रकाशित करणे निषिद्ध आहे.

8. सेवेतील बदल / निलंबन

वेबसाइट प्रशासनाला कोणत्याही वेळी सेवा बदलण्याचा, तात्पुरती थांबविण्याचा किंवा निलंबित करण्याचा अधिकार आहे.

अशा बदलांमुळे वापरकर्त्याला कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.

9. तृतीय पक्ष दुवे (Third Party Links)

वेबसाइटवर दिलेले बाह्य दुवे (external links) फक्त संदर्भासाठी आहेत.

त्या साइटवरील माहितीच्या अचूकतेसाठी किंवा सुरक्षिततेसाठी nashikelection.in जबाबदार नाही.

10. कायदेशीर अधिनियमन

या अटी व शर्तींवर भारतीय कायद्याचा (Indian Law) अधिनियमन लागू राहील.

कोणत्याही वादासाठी नाशिक न्यायालयासच अधिकारक्षेत्र असेल.

11. संपर्क साधा

कोणतेही प्रश्न, तक्रार किंवा सूचना असल्यास कृपया खालील माध्यमातून संपर्क साधा:

📧 ई-मेल: info@nashikelection.in
🏢 पत्ता: कॅलिबर्स इन्फोटेक, नाशिक, महाराष्ट्र

Menu